ब्रेमेन चौक येथे उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्तीची मागणी

*नगरसेवक सनी निम्हण यांची मागणी

पुणे :

पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक तथा राज्य सुधारित युवा धोरण समिती सदस्य सनी विनायक निम्हण यांनी पुणे महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन देत शिवाजीनगर मतदारसंघातील ब्रेमेन चौक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन प्रस्तावित उड्डाणपूल प्रकल्पासाठी तज्ज्ञ सल्लागार नियुक्त करण्याची मागणी केली आहे.

शिवाजीनगर मतदारसंघातील औंध येथील ब्रेमेन चौक हा पुणे महानगरपालिका हद्दीतील अत्यंत महत्त्वाचा आणि वर्दळीचा चौक असून, औंध–विद्यापीठ परिसर तसेच मुंबई–बंगळुरू महामार्गाला जोडणारा प्रमुख मार्ग आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांना जोडणारा हा महत्त्वाचा दुवा असल्याने या मार्गावर दिवसेंदिवस वाहतुकीचा मोठा ताण वाढत आहे. याच मार्गावर अनेक व्हीआयपींची ये-जा होत असल्यामुळे हा “व्हीआयपी मूव्हमेंट रोड” म्हणूनही ओळखला जातो.

सध्या ब्रेमेन चौक परिसरात मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत असून त्यामुळे वाहतूक रहदारी विस्कळीत होत आहे. नागरिकांना दररोज मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून या ठिकाणी उड्डाणपूल उभारणे अत्यावश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

आणखी वाचा   पुणे महापालिका निवडणुकीत भाजपचा ‘वंशपरंपरा फॉर्म्युला’