ईडीची बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई

पुणे:

आज पहाटे ईडीने बारामती आणि पुणे जिल्ह्यांमध्ये मोठी कारवाई केली आहे. विद्यानंद डेअरीशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार आणि गुंतवणूकदारांची तब्बल १०८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी ही छापेमारी सुरू आहे.सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून, तो आमदार रोहित पवार यांचा निकटवर्तीय असल्याचे बोललं जात आहे.

ईडीच्या पथकांनी पुणे जिल्ह्यामध्ये दोन ठिकाणी आणि बारामती तालुक्यात जळोची, खताळ पट्टा आणि झारगडवाडी यांसह तीन ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम सुरू केली. सध्या फरार असलेला आनंद सतीश लोखंडे आणि त्याची पत्नी विद्या लोखंडे यांच्याशी संबंधित मालमत्तांवर हे छापे टाकण्यात आले. हे दोघे या प्रकरणातील मुख्य आरोपी आहेत.

आणखी वाचा   वानवडी प्रभागात ईव्हीएमवर संशय ; काँग्रेस उमेदवाराचा निवडणूक आयोगावर गंभीर आरोप